महाराष्ट्र राज्याने जमिनीचे रेकॉर्डस् आता ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत आता तुम्हाला भूमि अभिलेख कार्यालयात जायची आवश्यक्यता नाही. Maha Bhulekh Mahabhumi पोर्टल च्या माध्यमातून तुम्ही 7/12, 8A, Property Card आणि इतर रेकॉर्ड ऑनलाईन प्राप्त करू शकता.
Land Records Available on Mahabhulekh
- विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक
- डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक
- महाभूनकाशा
- फेरफार माहिती, नोटीस, स्थिती
- जुने अभिलेख (Old Land Records)
- Other Services
- PM Kisan Status (18th Installment)
- राशन कार्ड
- Aaple Sarkar – (Income, Birth, Caste, Other Certificate)
विना स्वाक्षरीतील 7/12 Utara, 8A, Property Card
(विना स्वाक्षरीतील महाभूलेख ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.)
- सर्वात अगोदर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत पोर्टल वर जायचे आहे.
- अधिकृत पोर्टल वर आल्यावर विभाग (Division) निवडून Go बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल.
Amravati (अमरावती) | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम |
Aurangabad (औरंगाबाद) | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
Kokan (कोकण) | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
Nagpur (नागपूर) | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा |
Nashik (नाशिक) | अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक |
Pune (पुणे) | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
- आता तुम्हाला ७/१२, ८अ, आणि मालमत्ता पत्रक यातून तुम्हाला हवा तो दस्तावेज निवडायचा आहे उदाहरणासाठी आम्ही इथे ७/१२ हा दस्तावेज निवडत आहोत. त्यानंतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा, तालुका, गाव निवडा आणि शोध घेण्यासाठी सर्वे/गट नंबर किंवा संपूर्ण नाव दर्ज करून शोधा बटनावर क्लिक करा. शेवटी मोबाइल नंबर दर्ज करून ७/१२ पहा बटनावर क्लिक करा.
- सातबारा उतारा बघण्या अगोदर Captcha Code दर्ज करून Verify Captcha to View 7/12 बटनावर क्लिक करा.
- शेवटी तुमच्या स्क्रीनवर 7/12 utara in marathi online येईल यात तुम्हाला अहवाल दिनांक सोबत ULPIN नंबर, मालकांचे नाव, फेरफार माहिती, क्षेत्रफळ आणि इतर माहिती प्राप्त होईल.
सूचना – विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी वापरता येऊ शकत नाही.
Visit the Official Portal |
bhulekh.mahabhumi.gov.in |
Important Links
महा भूनकाशा (जमिनीचा नकाशा) | डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक |
आपले अभिलेख (जुने ७/१२ आणि फेरफार) | आपली चावडी (७/१२ फेरफार नोटीस, स्थिती) |
भूमि अभिलेख संपर्क माहिती
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय |
तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे दूरध्वनी : ०२०-२६०५०००६, ई-मेल : dlrmah[dot]mah[at]nic[dot]in |